दिल्लीच्या उपराज्यपालांच्या कार्यालयातील १३ जण कोरोना बाधित


नवी दिल्ली – जीवघेण्या कोरोनाचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढतच असून त्यातच आज सकाळी दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयातील १३ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. दिल्लीतील कोरोनाबाधितांचा आकडा २० हजारांच्या पार गेला आहे.

सोमवारी दिल्लीत चार दिवसानंतर एक हजारांपेक्षा कमी कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्या अगोदर दिल्लीत २८ ते ३१ मे दरम्यान सलग हजार पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. तर ९९० रुग्ण १ जून रोजी आढळले होते. दिल्लीतील कोरोनाबाधितांची संख्या २० हजार ८३४ वर पोहचली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ५२३ झाली आहे.

Leave a Comment