तेलंगानाच्या महबूबनगरमधील नवाबपेट मंडल येथील गावातील 100 नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. गावातील सरपंचाने काही दिवसांपुर्वी 4 हजार लोकांना लोणचे वाटले होते. आता हे लोणचे बनवणाऱ्या व्यापारी आणि आचाऱ्याला कोरोना झाल्याचे समोर आल्यानंतर गावकऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. गावकऱ्यांना संसर्गाच्या भितीने लोणचे देखील फेकून दिले आहे.
सरपंचाचे लोणचे पडले महागात, 100 लोक क्वारंटाईनमध्ये
तेंलगानामध्ये उन्हाळ्यात आवडीने लोणचे खाल्ले जाते. मात्र आता गावकऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. जिल्हा मेडिकल आणि आरोग्य अधिकारी (डीएमएचओ) डॉ. के कृष्णा यांनी सांगितले की आतापर्यंत एकाही नागरिकाला संसर्ग झाल्याचे समोर आलेले नाही. काही गावकरी लोणचे खाल्ल्याने घाबरलेले आहेत. मात्र आम्ही त्यांना समजवत आहोत की लोणचे खाल्ल्याने संसर्ग होत नाही.
अधिकाऱ्यांनुसार, सरपंच आणि त्यांच्या पतीने गावातील सर्वांना लोणचे वाटप करण्याची योजना बनवली होती. यासाठी ते कोल्लूरपासून 50 किमी लांब शादपूर येथील एका लोणचे बनवणाऱ्या ट्रेडरला भेटण्यास गेले. ट्रेडरने दोन आचाऱ्यांची सोय केले. सरंपचाने 12 लोकांना मिळून लोणचे तयार केले. काहीजणांनी त्याच दिवशी लोणचे खाल्ले तर काहीजण घरी घेऊन गेले. मात्र ट्रेडर आणि एक आचारी कोरोनाग्रस्त असल्याचे आढळल्याने गावकरी घाबरले आहेत.