व्हॅली ऑफ फ्लॉवर्स बहरली, पर्यटकांना अजून परवानगी नाही

फोटो साभार टाईम्स ऑफ इंडिया

युनेस्कोने जागतिक वारसा स्थळात सामील केलेली उत्तराखंड राज्याच्या चमोली जिल्ह्यातील ‘फुलों की घाटी’ म्हणजेच व्हॅली ऑफ फ्लॉवर्स सोमवारी जिल्हाधिकारी स्वाती भादौरीया यांच्या हस्ते उघडली गेली मात्र उत्तराखंड मधील लॉक डाऊन अजून पूर्ण उठविला गेला नसल्याने पर्यटक आत्ताच या स्थळाला भेट देऊ शकणार नाहीत. पर्यटक कधीपासून येथे जाऊ शकतील त्या तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत.

फोटो साभार उत्तराखंड टुरिझम

बद्रीनाथच्या वाटेवर शिखांचे पवित्र स्थान असलेल्या हेमकुंड साहिब मार्गावर नंदादेवी राष्ट्रीय उद्यानाजवळ हे नितांतसुदर पर्यटनस्थळ असून तेथे जाण्यासाठी बरेच ट्रेकिंग करावे लागते. या ठिकाणी ५०० हून अधिक जातीची फुले दरवर्षी जून ते ऑक्टोबर या काळात फुलतात. आसपासचे सर्व डोंगर या फुलांनी बहरून येतात. ८७.५ किमी परिसरात ही व्हॅली पसरलेली आहे. शांत, सुंदर अश्या या ठिकाणी जैव विविधतेचा अनुपम खजिना आहे.

दरवर्षी देश विदेशातून लाखो पर्यटक व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला भेट देण्यासाठी येतात. मात्र यंदा करोना मुळे विदेश पर्यटक कमी प्रमाणात येतील तसेच भारतीय पर्यटक ही कमी प्रमाणात येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment