रिमुव्ह चीनी अॅपला प्रचंड प्रतिसाद

फोटो साभार नई दुनिया

लडाख सीमेवर चीनने सैन्य जमा करायला केलेली सुरवात, लडाख मधील प्रसिद्ध वैज्ञानिक सोनम वायचुंक यांनी त्यावर उपाय म्हणून भारतीयांनी चीनी मालावर बहिष्कार घालण्याचे व्हिडीओ वरून केलेले आवाहन याचा परिणाम दिसू लागला आहे. गुगल अँड्राईड प्ले स्टोर्स मध्ये रिमुव्ह चीनी अॅप साठी नवीन अॅप लाँच झाले असून अल्पावधीत १० लाख युजरनी ते डाऊनलोड केले आहे.

चीनी वस्तूंवर भारतीयांनी बहिष्कार टाकल्याची अनेक उदाहरणे आहेत. यापूर्वीही अनेकदा अशी परिस्थिती आली आहे की भारतीयांनी चीनी उत्पादनांवर बहिष्कार घातला आहे. सध्या चीन मधून आलेला आणि जगभरातील नागरिकांच्या कर्दन काळ बनलेला करोना आणि भारत चीन सीमेवर चीनने वाढविलेला तणाव यामुळे भारतीय चीनविरोधात सक्रीय झाले आहेत. जयपूरच्या एका स्टार्टअपने स्मार्टफोन वरून चीनी अॅप काढून टाकण्यासाठी हे नवे अॅप लाँच केले आहे. विशेष म्हणजे अगदी थोडक्या काळात ते गुगलच्या टॉप फ्री लिस्ट मध्ये दोन नंबरवर आले आहे.

हे अॅप ३.५ एमबीचे असून फ्री डाऊनलोड करता येते. तुम्ही हे अॅप डाऊन लोड करून रिमुव्ह चीनी अॅप अशी मंजुरी दिली की सर्व चीनी अॅप शोधून ती डीलिट केली जातात. हे अॅप १७ मे रोजी लाँच केले गेले असून सध्या ते फक्त अँड्राईड ओएस साठीच उपलब्ध आहे.

Leave a Comment