या इलेक्टिक बाईकला पॅडलची सोय

फोटो साभार इलेट्रेक

ई रॉकेट इलेक्ट्रिक मोटरसायकल कंपनीने युनिक ड्राईव्ह सिस्टीम सह इलेक्ट्रिक मोबिलिटी उद्योगात क्रांती घडविण्याचा प्रयत्न केला असून त्यांची इलेक्ट्रिक बाईक सायकल म्हणूनही चालविता येणार आहे. यासाठी या बाईकला पॅडल सुविधा दिली गेली आहे. ई रॉकेट ही जर्मन बेस्ड कंपनी असून त्यांनी सादर केलेली ही युनिक बाईक शहरात फिरण्यासाठी आदर्श असल्याचे म्हटले आहे.

या मोटरसायकलच्या निर्मात्यांनी ही बाईक पेट्रोल पॉवर्ड मोटरसायकल प्रमाणे परफॉर्म करण्यास सक्षम असल्याचा दावा केला आहे. या बाईकच्या युजरने पेडल मारले तर ८० किमीपर्यंत तिचा वेग वाढू शकतो असे नमूद केले आहे. तिला ६.६ केडब्ल्यूएच बॅटरी असून सिंगल चार्ज मध्ये टी १२० किमी अंतर कापू शकते. त्यामुळे काही वेळ पेडल केले तर एखाद्या शहरात फिरण्यासाठी ते पुरेसे ठरणार आहे.

विशेष म्हणजे हे पेडल मागच्या चाकाशी जोडलेले नाही. सर्व सायकल्स मध्ये ते चेन सेटअपने मागच्या चाकाशी जोडलेले असते. त्याऐवजी या बाईकमध्ये पेडल जनरेटर पॉवरच्या सहाय्याने त्यामध्ये जाणारी मॅनपॉवर मोजतो. पेडलचा वेग मोजण्याचा उपयोग रिअर व्हीलला किती मोटर शक्ती आवश्यक आहे याचा अंदाज येतो. या बाईकचे वजन १२० किलो आहे.

या बाईकला इको, नॉर्मल आणि स्पोर्ट असे तीन ड्रायविंग मोड असून नेहमीच्या सॉकेटवर ती चार्ज करता येते. रस्त्यावर एल ३९ वाहन श्रेणीमध्ये ती सामील केली गेली असून युरोप मध्ये हलकी मोटरसायकल परवाना तिला दिला गेला आहे. या बाईकची किंमत ११८५० युरो म्हणजे भारतीय रुपयात ९.८९ लाख रुपये आहे.

Leave a Comment