ड्रॅगन क्रू कॅप्सूल म्हणून आहे खास

फोटो साभार स्पेस न्यूज

अॅलन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीने दोन अंतराळविरांसह पाठविलेले ड्रॅगन क्रू कॅप्सूल आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर १९ तासांचा प्रवास करून सुखरूप पोहोचले असून अंतराळात मानवासहित यान पाठविण्याची कामगिरी करणारी स्पेस एक्स ही पहिली खासगी कंपनी बनली आहे. ही ड्रॅगन क्रू कॅप्सूल स्पेस एक्सनेच तयार केली असून ती एक विशेष प्रकारची कॅप्सूल आहे. फाल्कन ९ रॉकेटच्या सहाय्याने ती केनेडी अंतराळ प्रक्षेपक केंद्रातून अंतराळात पाठविली गेली.

अंतराळ स्टेशनवर अंतराळवीर पाठविण्याच्या मोहिमा बऱ्याचदा पार पाडल्या जातात. त्यासाठी वापरण्यात येणारी अंतराळयाने किंवा रॉकेट एकच वेळा वापरता येतात. पण मस्क यांनी बनविलेल्या ड्रॅगन क्रू कॅप्सूल चे विशेष म्हणजे ते रीयुजेबल आहे म्हणजे त्याचा वापर परत परत करता येणार आहे. शिवाय त्यातून एकावेळी सात अंतराळवीर प्रवास करू शकणार आहेत. यावेळी या कॅप्सूलमधून बोब बेहाम्केन आणि डग हार्ली हे दोन अंतराळवीर अंतराळ स्थानकावर पोहोचले आहेत.

अन्य यानांच्या तुलनेत या कॅप्सूल मध्ये अधिक जागा उपलब्ध केली गेली आहे. शिवाय अत्यंत कमी नॉब आणि बटनांचा वापर करावा लागणार आहे. यात पूर्णपणे टच स्क्रीन सुविधा असून ते डॉक करता येते. म्हणजे ही कॅप्सुल स्वतःच दुसऱ्या अंतराळ यानाला जोडून घेऊ शकते. यात लाँच एस्केप सिस्टीम म्हणजे एक प्रकारची क्रू सेफ्टी सिस्टीम बसविली गेली आहे.

मस्क यांनी सर्वसामान्य माणसालाही अंतराळ यात्रा घडविण्याचे स्वप्न पाहिले असून त्या साठी त्यांनी मागेच बुकिंग घेण्यास सुरवात केली आहे.

Leave a Comment