आले करोना स्पेशल ब्रायडल कलेक्शन

फोटो साभार भास्कर

करोना कोविड १९ ने जगात हातपाय पसरले आणि मानवी स्वभावाप्रमाणे लोकांनी त्यातूनही मार्ग काढून करोना साठी दररोज वापराव्या लागणाऱ्या वस्तू अधिक आकर्षक कश्या बनविता येतील यावर लक्ष केंद्रित केले. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे पाश्चात्य देशात विवाह विधीच्या वेळी वधू जो खास ड्रेस परिधान करतात त्याला मँचिंग मास्क बनविले जाऊ लागले आहेत. आयर्लंडच्या ओआना फॅशन स्टोर्सची मालकीण ओआना हिने लॉकडाऊन मुळे व्यवसायावर वाईट परिणाम झाल्याचे स्पष्ट करताना देशातील हा वास्तविक लग्नाचा सिझन असल्याने त्याची तीव्रता अधिक जाणवत असल्याचे सांगितले.

ओआना हिने लग्नात वधूसाठी विशेष ड्रेस तयार करताना त्याला शोभतील असे मॅचिंग मास्क बनविण्यास सुरवात केली आहे. हे मास्क तिने स्पेशल ब्रायडल कलेक्शन मध्ये सामील केले असून त्याला चांगली मागणी येत आहे. लग्न ठरलेल्या मुलींकडून या कलेक्शनला विशेष पसंती मिळत असल्याचे दिसून आले आहे.

आयर्लंड मध्येही मास्क वापरणे बंधनकारक आहे. त्यामुळे वधू वर यानाही मास्क घालूनच विवाह करावे लागत आहेत. अश्यावेळी वधूच्या सुंदर ड्रेसला मॅचिंग होईल असे मास्क घेण्याकडे कल वाढला आहे. ओआना सांगते आमच्याकडे कोविड १९ मुळे मार्च मध्येच बाजार बंद झाले. त्यामुळे विवाह ठरलेल्या वधूंच्या वधूवेशाचे फिटिंग व डिझायनिंग ऑनलाईन करण्याची वेळ आली. अनेकांनी आर्थिक टंचाई मुळे विवाह पुढे ढकलले तर बाकीच्यांनी ड्रेसला मॅच होतील अश्या मास्कची मागणी केली.

हे मास्क हँडमेड आहेत. ओआना असाही एक खास हँडमास्क तयार करते आहे जे विकून मिळणारे उत्पन्न फ्रंटलाईन वर्कर्स साठी दिले जाणार आहे.

Leave a Comment