अमेरिकेने डब्ल्यूएचओमध्ये पुन्हा सहभागी होण्याची दिले संकेत, ठेवली ही अट

कोरोना व्हायरस महामारी संदर्भात ठोस पावले न उचलल्याने अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आता अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी अमेरिका पुन्हा डब्ल्यूएचओमध्ये सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत. मात्र यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे.

Image Credited – indianexpress

रॉबर्ट ओ ब्रायन म्हणाले की, डब्ल्यूएचओ भ्रष्टाचार आणि चीनची बाहुली बनणे बंद केले तर अमेरिका पुन्हा सहभागी होण्याचा विचार करेल. एका चॅनेलशी बोलताना ब्रायन म्हणाले की, राष्ट्रपतींनी म्हटले आहे की डब्ल्यूएचओमध्ये सुधारणांची गरज आहे. जर त्यात सुधारणा झाल्या व भ्रष्टाचार तसेच चीन धार्जिणी असणे बंद केल्यास अमेरिका गंभीरतने पुन्हा जागतिक आरोग्य संघटनेत सहभागी होण्याचा विचार करेल.

Image Credited – The Hindu

दरम्यान, कोरोना व्हायरसवरून डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार चीन आणि डब्ल्यूएचओवर टीका केली आहे. मागील महिन्यात ट्रम्प यांनी संघटनेचा निधी देखील थांबवला होता व त्यानंतर संघटनेशी संबंध तोडत असल्याचे म्हटले होते.

Leave a Comment