पाकिस्तानचे मनसुबे नाकाम, उच्च आयुक्तालयातील अधिकाऱ्यांना हेरगिरी करताना रंगे हाथ पकडले

दिल्लीतील पाकिस्तानी उच्च आयुक्तालयातील दोन अधिकाऱ्यांनी हेरगिरी करताना रंगे हाथ पकडण्यात आले आहेत. या अधिकाऱ्यांचे नाव आबिद हुसैन आणि ताहिर हुसैन असून, ते पाकिस्तान उच्च आयुक्तालयात व्हिसा सेक्शनमध्ये काम करतात. या दोघांनाही एका भारतीयाकडून संवेदनशील कागदपत्रे मिळवताना पकडण्यात आले आहे. 44 वर्षीय आबिद हुसैन पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील स्थित शेखपुरा जिल्हा आणि 44 वर्षीय मोहम्मद ताहिर हा इस्लामाबाद येथील आहे.

Image credited – Zee News

दोघेही दिल्लीच्या रस्त्यावर फिरून हेरगिरी करत असे व स्वतःला बनावट आयडीद्वारे भारतीय असल्याचे सांगत. परराष्ट्र मंत्रालयाने दोघांना पर्सन नॉन-ग्रेटा घोषित केले असून, दोघांनाही 24 तासांच्या आत भारत सोडावा लागणार आहे.

2016 मध्ये देखील अशाच प्रकारची घटना घडल्यानंतर पाकिस्तानी उच्च आयुक्तलयात काम करणाऱ्या महमूद अख्तरला देश सोडण्यास सांगण्यात आले होते.

Leave a Comment