कोरोनाच्या धक्क्यातून सावरण्यासाठी मोदींनी घेतले हे मोठे निर्णय - Majha Paper

कोरोनाच्या धक्क्यातून सावरण्यासाठी मोदींनी घेतले हे मोठे निर्णय


नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी या आधीच 20 लाख आर्थिक कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. आज लघु उद्योग आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे.

  • केंद्र सरकारने देशातील लघु उद्योगांना सावरण्यासाठी या क्षेत्रात 20 हजार कोटी रुपये गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना अल्प मुदतीत व्याज, या क्षेत्राच्या विकासासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, त्यांच्या मालाला प्रोत्साहन देण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.
  • त्याचबरोबर केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी 14 खरीप पिकांच्या हमी भावात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून आधारभूत किंमत 50 वरून 85 टक्क्यांवर नेण्यात आली आहे.
  • शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जावर तीन टक्के कर्जमाफी देण्यात येणार असून काही लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.
  • कर्जाचे हप्ते भरण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी सुट देण्यात आली असून त्यांना आता ऑगस्टपर्यंत मुदत मिळाली आहे. त्याचबरोबर त्यांचे या काळातील व्याजही माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
  • तसेच सरकारने डिजिटल पेमेंटला चालण्या देण्यासाठी आणखी उपाय योजनाही जाहीर केल्या आहेत. त्यानुसार डिजिटल पेमेंटवर लघु उद्योगांना सुटही दिली जाणार असून त्याचा वापर ग्रामीण भागातही वाढावा असे प्रयत्न केला जाणार आहेत.

Leave a Comment