गुगलने केले वर्ण समानतेचे समर्थन, तुम्ही एकटे नाही – सुंदर पिचाई

अमेरिकेत एका कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांकडून मृत्यू झाल्यानंतर संपुर्ण देशात हिंसक प्रदर्शन सुरू आहेत. आता अल्फाबेट इंक आणि गुगलचे सीईओ सीईओ सुंदर पिचाई यांनी आपण आफ्रिकन-अमेरिकन समुदायासोबत असल्याचे म्हटले आहे. तसेच जे दुःखी आहेत, ज्यांना राग येत आहे व भिती वाटत आहे असे लोक एकटे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोबतच ट्विटरवर त्यांना गुगल आणि युट्यूबच्या होमपेजवर काळी रिबन असलेला फोटो शेअर करत त्यांची कंपनी वर्ण समानतेचे समर्थन करते, असे म्हटले आहे.

त्यांनी ट्विट केले की, आज अमेरिकेच्या गुगल आणि युट्यूब होमपेजवर आम्ही कृष्णवर्णीय समुदायाच्या एकतेसाठी व जॉर्ज प्लाइड, ब्रेओना टेलर, अहमद अर्बेरी आणि इतर असे लोक ज्यांचा आवाज ऐकला जात नाही अशांसाठी वर्ण समानतेला पाठिंबा दर्शवतो. जे दुःखी आहेत, ज्यांना राग येत आहे व भिती वाटत आहे असे लोक एकटे नाहीत.

दरम्यान, मिनिआपोलिस शहरात जॉर्ज फ्लॉइड यांच्या गळ्यावर 5 मिनिटांपेक्षा अधिक वेळा गुडघा ठेऊन बसलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या घटनेत जॉर्ज फ्लॉइड यांचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेत हिंसाचाराच्या घटना घडत आहेत.

Leave a Comment