कोरोनापासून वाचवण्यासाठी बनविले हे सोशल डिस्टेंसिंगवाले हटके बूट

कोरोना व्हायरसमुळे बाहेर पडताना सोशल डिस्टेंसिंगचे पालन करणे अनिवार्य आहे. मात्र असे असले तरी अनेकजण बाहेर पडल्यानंतर नियमांचे पालन करत नाहीत. अशा लोकांसाठी रोमानियामधील एका शू मेकरने खास बूट तयार केले आहेत. हे बूट घालून लोक बाहेर पडल्यानंतर आपोआपच सोशल डिस्टेंसिंगचे पालन होईल.

Image Credited – Navbharattimes

क्लूजच्या ट्रांसिल्वेनिया शहरातील ग्रिगोर लूप यांनी हे हटके बूट तयार केले असून, या बुटांचा पुढील भाग सर्वसाधारण बुटांपेक्षा खूपच मोठा आहे. ग्रिगोर मागील 39 वर्षांपासून लेदरचे बूट बनवत आहेत. त्यांनी सांगितले की, एकेदिवशी बाजारात गेले असता त्यांनी पाहिले की लोक सोशल डिस्टेंसिंगचे पालन करत नाहीत. तेव्हाच त्यांनी लांब टोक असणारे बुट बनवण्याचा निर्णय घेतला.

Image Credited – India Today

हे बूट घातल्याने समोरील व्यक्तीमध्ये दीड मीटरचे अंतर असते. अशा बुटांचा एक जोड तयार करण्यासाठी 2 दिवस आणि 115 डॉलर (जवळपास 8500 रुपये) खर्च येतो. त्यांना अशा बुटांच्या 5 ऑर्डर्स देखील मिळाल्या आहेत.

Leave a Comment