सोशल डिस्टेंसिंगचे पालन न केल्याने या देशाच्या पंतप्रधानांना बसला 45 हजारांचा दंड

कोरोना व्हायरस महामारीच्या काळात मास्क लावणे, सोशल डिस्टेंसिंगचे पालन करण्यास सरकार सांगत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे यासाठी सरकारमधील मंत्री, पंतप्रधान यांनी देखील नियम पाळून त्यांच्यासमोर उदाहरण ठेवण्याची गरज असते. मात्र सोशल डिस्टेंसिंगचे पालन न केल्याने एका देशाच्या पंतप्रधानांना चक्क दंड भरावा लागल्याची घटना घडली आहे. रोमानियाचे पंतप्रधान लुडोव्हिक ओरबान यांना नियमांचे पालन न केल्याने 600 डॉलर (जवळपास 45 हजार रुपये) दंड भरावा लागला आहे.

लुडोव्हिक यांचे स्मोकिंग करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोमध्ये लुडोव्हिक हे सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. ते मंत्र्यांसोबत सरकारी बिल्डिंगमध्ये बसून स्मोकिंग करत आहेत. याशिवाय त्यांनी मास्क देखील लावला नव्हता.

रोमानियामध्ये सध्या कोरोना व्हायरसमुळे स्मोकिंग करणाऱ्यावर निर्बंध आहेत. याआधी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात देखील त्यांनी मास्क लावला नव्हता.  हे सर्व नियम मोडल्याने त्यांना 600 डॉलर्स दंड भरावा लागला आहे.

Leave a Comment