पावसाळ्यात कोरोनाचे काय होणार ?, जाणून घ्या तज्ञांचे मत

भारतात पावसाचे आगमन झाले असून, हवामान विभागाने याची पुष्टी केली आहे. पावसाळ्याचा कोरोना व्हायरस कसा परिणाम होतो ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पावसाळ्यात कोरोनाचा संसर्ग वाढेल की थांबेल याबाबत तज्ञांचे काय मत आहे जाणून घेऊया.

Image Credited – Aajtak

यूनिव्हर्सिटी ऑफ डेलावेयरच्या संसर्गजन्य रोग विभागाचे वैज्ञानिक जेनिफर होर्ने म्हणाले की, पावसाळ्याचे पाणी व्हायरसला नष्ट करू शकत नाही. यामुळे व्हायरसचा प्रसारचा वेग देखील कमी होणार नाही. याच प्रमाणे केवळ पाण्याने हात न धुवता साबण वापरावा.

Image Credited – WebMD

अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिंस यूनिव्हर्सिटीचे अ‍ॅप्लाइड फिजिक्सचे वैज्ञानिक जेर्ड इव्हांस यांच्यानुसार, पावसाळ्याचा कोरोनावर काय परिणाम होईल याची अद्याप माहिती नाही. मात्र अधिकांश वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की पावसाळ्यात व्हायरसचा प्रसार वाढेल. मात्र वॉशिंग्टन यूनिव्हर्सिटीचे ग्लोबल हेल्थ, मेडिसिन आणि एपिडिमियोलॉजीचे प्रोफेसर जेई बेटन म्हणाले की, पाऊस कोरोना व्हायरसला कमकुवत करू शकतो. ज्याप्रमाणे धूळ पावसाच्या पाण्यात मिसळून वाहून जाते, तसेच व्हायरस देखील वाहून जाऊ शकतो.

Image Credited – Aajtak

यूनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँडनुसार, कोरोना व्हायरसचे असे अनेक प्रकरण समोर आले आहेत, ज्यात 17 दिवसांनंतर देखील पृष्ठभागावर कोरोना आढळला आहे. त्यामुळे पावसाळ्यामुळे पृष्ठभाग, मैदान अथवा खुर्चीवरील व्हायरस नष्ट होईल असे म्हणणे अवघड आहे. पावसाळ्यात अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे अनेक तज्ञांचे म्हणणे आहे. कारण आर्द्रतेमुळे हवेत कोरोना व्हायरस अधिक काळ राहू शकतो. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढते.

Leave a Comment