सीएम केअर फंडात जमा असलेल्या 342 कोटींपैकी 7 टक्के रक्कम आरोग्य सुविधांसाठी खर्च


मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 खात्यात 342 कोटी रुपये देणगीदारांच्या मदतीने जमा झाले असून कोविडच्या नावावर प्रत्यक्षात केवळ 23.82 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान माहिती अधिकारांतर्गत अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 या खात्यात जमा झालेली एकूण रक्कम आणि वाटप केलेल्या रकमेची माहिती मागितली होती. त्यावर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे सहाय्यक लेखापाल मिलिंद काबाडी यांनी याबाबतची माहिती दिली. सर्वाधिक 55.20 कोटी रुपये परप्रांतीय कामगारांच्या प्रवासासाठी खर्च करण्यात आले आहेत. तर औरंगाबाद रेल्वेतील अपघात ग्रस्तांना 80 लाख रुपये देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली आहे.

कोविड-19 साठी जमा केलेल्या एकूण रक्कमेपैकी केवळ 7 टक्के रक्कम ही राज्य सरकारने आरोग्य सेवांवर खर्च केली आहे. 16 टक्के स्थलांतरित कामगारांच्या रेल्वे तिकिटावर आणि 0.23 टक्के रेल्वे अपघातग्रस्तांवर रक्कम खर्च केल्याचा दावा अनिल गलगली यांनी केला आहे.

Leave a Comment