निलेश राणेंची पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर टीका - Majha Paper

निलेश राणेंची पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर टीका


मुंबई – पदवी-पदव्युत्तरच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना कोरोनाबाबतच्या अनिश्चिततेचा फटका बसू नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत मिळवलेल्या गुणांची सरासरी काढून परीक्षांऐवजी विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय जाहीर केला. उद्धव ठाकरेंनी रविवारी राज्यातील जनतेला संबोधित करताना अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर भाष्य केले. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.


याबाबत त्यांनी एक ट्विट केले असून निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये “जे परीक्षा न देताच मुख्यमंत्री झाले, त्यांनी हा निर्णय घेणे हे काही नवल नाही,” असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे. कोरोनाची अनिश्चितता पाहता अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरासरी गुण देण्याच्या घेतलेल्या निर्णयावरून त्यांनी मुख्यमंत्र्यांवर ट्विटरवरून टीका केली.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदवी-पदव्युत्तरच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना कोरोनाबाबतच्या अनिश्चिततेचा फटका बसू नये, यासाठी आतापर्यंत मिळवलेल्या गुणांची सरासरी काढून परीक्षांऐवजी विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय जाहीर केला. रविवारी राज्यातील जनतेशी ठाकरे यांनी संवाद साधला. अनिश्चित काळासाठी अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा लांबली तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती होती. त्यामुळे अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना त्यांनी आतापर्यंतच्या सत्रांत मिळवलेल्या गुणांची सरासरी काढून उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. श्रेणी वाढवण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये परीक्षा घेण्यात येईल, असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते.

Leave a Comment