नरेंद्र मोदींनी कोरोना वॉरिअर्संवर हल्ले करणाऱ्यांना झापले


नवी दिल्ली – देशात वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना वॉरिअर्स हे पहिल्या दिवसापासून अहोरात्र मेहनत करत आहेत. पण याचदरम्यान त्यांच्यावर हल्ले देखील झाल्याच्या घटना आपण पाहिल्या किंवा वाचल्या असतील. अशातच कोरोना वॉरिअर्सवर हल्ले हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे. त्यातच आता यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: भाष्य केले असून हे सहन केले जाऊ शकत नसल्याचे म्हणत हल्ले करणाऱ्यांना चांगलेच झापले आहे.

यावर भाष्य करताना मोदी म्हणाले की, पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांच्यासोबत हिंसाचार, असभ्य वर्तन आणि गैरवर्तन कधीही सहन केले जाऊ शकत नाही. कर्नाटकमधील राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सच्या रौप्यमहोत्सव कार्यक्रमात नरेंद्र मोदी बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले.

नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, कोरोनाचे संकट जर नसते तर तुमच्यासोबत मला तिथे उपस्थित राहायला आवडले असते. डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी आणि संशोधकांकडे संपूर्ण जग आजच्या घडीला आशेने पाहत आहे. तुमच्याकडून काळजी आणि उपाय दोन्हींची जगाला गरज आहे. कोरोना व्हायरस एक अदृश्य शत्रू असेल, पण आपले योद्धा आरोग्य कर्मचारी अजिंक्य आहेत आणि आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच या लढाईत विजय होणार, असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी यावेली व्यक्त केला.

Leave a Comment