कोरोना व्हायरसच्या लस निर्मितीवर कार्य करणाऱ्या ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटीच्या टीममध्ये एका भारतीय वैज्ञानिकाचे नाव देखील जोडले गेले आहे. कोलकत्ताच्या भारतीय वंशाच्या वैज्ञानिक चंद्रबाली दत्ता यांचा या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. चंद्रबाली याविषयी म्हणाल्या की या मानवीय उद्देशाचा भाग बनून सन्मानित झाल्यासारखे वाटत आहे. याच्या परिणामांवर जगाच्या आशा जोडलेल्या आहेत.
कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीत मोलाची भूमिका बजावणार भारतीय वंशाच्या या महिला वैज्ञानिक

कोलकत्तामध्ये जन्मलेल्या चंद्रबाली दत्ता या यूनिव्हर्सिटीच्या जेन्नेर इंसिट्यूटमध्ये क्लिनिकल बायोमॅन्युफॅक्चरिंग विभागात काम करतात. येथेच कोरोनावरील सीएचडीओएक्स1 एनसीओव्ही-19 नावाच्या लसीचे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी ट्रायल सुरू आहे. क्वालिटी एश्योरेंस मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या 34 वर्षी दत्ता यांचे काम हे सुनिश्चित करणे आहे की लसीच्या सर्व स्तरांचे पालन केले जात आहे.

चंद्रबाली दत्ता म्हणाल्या की आम्हाला आशा आहे की पुढील टप्प्यात यात यश मिळेल. संपुर्ण जगाला या लसीकडून अपेक्षा आहेत. लसीची चाचणी यशस्वी करण्यासाठी दररोज अतिरिक्त तास काम करत आहोत, जेणेकरून लोकांचे प्राण वाचवता येतील. या योजनेचा भाग होणे सन्मानाची गोष्ट आहे. चंद्रबाली दत्ता यांनी कॉम्प्युटर सायन्स आणि बायोटेकचे शिक्षण घेतललेले आहे.