विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ


नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मागील तीन महिन्यापासून सातत्याने घट होत होती. पण एलपीजीच्या किंमतीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढ झाल्यामुळे त्याची झळ भारतालाही बसल्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. विनाअनुदानित गॅसच्या दरात वाढ आजपासून करण्यात आली आहे. राजधानी दिल्ली आणि मुंबईमध्ये १४ किलोच्या विनाअनुदानित गॅसच्या किंमतीत ११ रुपये ५० पैशांनी वाढ करण्यात आली आहे. तर ३१ रूपये ५० पैसे कोलकात्यामध्ये आणि ३७ रुपयांनी चेन्नईमध्ये वाढ करण्यात आली आहे.


इंडियन ऑईलच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, १४ किलोंचा विनाअनुदानित गॅसची राजधानी दिल्लीमध्ये किंमत ५९३ रुपये झाली आहे. कोलकातामध्ये ६१६ रुपये तर चेन्नईमध्ये ६०६.५० रुपये झाली आहे. १४ किलोच्या विनाअनुदानिक गॅसची किंमत आर्थिक राजधानी मुंबईत ५७९ वरुन आता ५९०.५० रुपये झाली आहे.

त्याचबरोबर यावाढीचा कोणताही परिणाम पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांवर एलपीजी सिलेंडरवर होणार नाही. ३० जूनपर्यंत पीएमयूवायच्या लाभार्थ्यांना एक विनामूल्य सिलेंडर मिळणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना तीन महिन्यांसाठी मोफत एलपीजी सिलेंडर देण्याची घोषणा केली होती.

Leave a Comment