नवी दिल्ली – WeTransfer.com ही लोकप्रिय फाइल-शेअरिंग वेबसाइट भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने ‘बॅन’ केली असून पण अद्याप पर्यंत ही वेबसाइट बंद करण्यामागचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. पण, सरकारने ही वेबसाइट जनहित आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बॅन केल्याचे सांगितले जात आहे.
फाइल-शेअरिंग वेबसाइट WeTransfer वर सरकारची बंदी
WeTransfer ही फाइल शेअरिंगसाठी एक लोकप्रिय वेबसाइट आहे. या वेबसाइटचा जगभरातील 50 मिलियनपेक्षा जास्त लोक वापर करतात. यासंदर्भातील वृत्त मुंबई मिररने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, WeTransfer च्या देशातील तीन URL बंद करण्याबाबतची नोटीस दूरसंचार विभागाने इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना जारी केली आहे. वेबसाइटवरील दोन निवडक युआरएल बॅन करण्यास पहिल्या दोन नोटिशीत सांगण्यात आले होते. तर पूर्ण WeTransfer वेबसाइट बॅन करण्याचे आदेश तिसऱ्या नोटिशीत देण्यात आले आहेत.
2 जीबीपर्यंतच्या फाइल्स WeTransfer या वेबसाइटद्वारे युजरच्या थेट ईमेलमध्ये झटपट आणि अगदी मोफत पाठवता येत होत्या. तर, 2 जीबीपेक्षा मोठ्या असणाऱ्या फाइलसाठी पैसे आकारुन प्लॅन घ्यायला लागत होता. पण बहुतांश युजर फ्री प्लॅनचाच वापर करतात. दरम्यान, WeTransfer.com वर सरकारने बंदी का घातली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण, WeTransfer ला बहुतांश आघाडीच्या इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी बॅन केले आहे.