हार्दिक-नताशाच्या घरी येणार नवीन पाहुणा, चाहत्यांनी दिल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने आपल्या फॅन्सला आश्चर्याचा धक्का देत लवकर तो आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा स्टॅन्कोविच आई-बाबा होणार असल्याची माहिती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. इंस्टाग्रामवर पांड्याने काही फोटो देखील शेअर केले आहेत.

फोटो शेअर करत त्याने लिहिले की, नताशा आणि माझा आतापर्यंतचा एकमेकांसोबतचा प्रवास चांगला होता व आता तो आणखी चांगला होणार आहे. आमच्या आयुष्यात लवकरच येणाऱ्या नवीन पाहुण्याचा आम्ही स्वागत करण्यास उत्सुक आहोत. आयुष्यातील या नवीन टप्प्यासाठी आम्ही उत्साही आहोत. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा व आशिर्वादाची गरज आहे.

पांड्याने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये दोघेजण पांरपारिक पोशाखात पुजा करताना देखील दिसत आहे. त्यांनी लॉकडाऊनमध्ये लग्न उरकल्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. याआधी देखील पांड्याने दोघांच्या साखरपुड्याची माहिती सोशल मीडियाद्वारेच दिली होती.

पांड्याने नताशा गर्भवती असल्याचा खुलासा त्याच्या चाहत्यांसाठी देखील एक धक्काच होता. सोशल मीडियावर अनेक युजर्सनी यावर मिम्स शेअर करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Leave a Comment