सोशल मीडिया कंपनी फेसबुकने अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले वेन्यू (Venue) अॅप अखेर लाँच केले आहे. या अॅपच्या मदतीने अँड्राईड आणि आयओएस युजर्स कोणत्याही इव्हेंटच्या लाईव्ह स्ट्रिमिंगशी जोडले जातील. युजर्स यात आपल्या प्रतिक्रिया देखील देऊ शकतील. मात्र अद्याप भारतासह अनेक देशात या अॅपला सादर करण्यात आलेले नाही. या अॅपला कंपनीच्या एनपीई टीमने तयार केले आहे.
लाईव्ह स्ट्रिमिंगसाठी फेसबुकने लाँच केले हे नवीन अॅप
फेसबुकच्या या नवीन अॅपचे टेस्टिंग नॅसकार फूड सिटीद्वारे आयोजित सुपरमार्केट हीरोज 500 रेसमध्ये केले जाईल. भविष्यात नॅसकारच्या रेसमध्ये लाईव्ह स्ट्रिमिंगसाठी वेन्यू अॅपचा उपयोग होईल.

नॅसकारचे मुख्य डिजिटल अधिकारी टिम क्लार्क म्हणाले की जगभरातील शर्यत प्रेमी आणि प्रशंसक फेसबुकच्या या नवीन अॅपद्वारे घरी बसल्या बसल्या सहज शर्यतीचा आनंद घेऊ शकतील. फेसबुकचे वेन्यू अॅप ट्विटरच्या लाईव्ह स्ट्रिमिंग सेवेला टक्कर देईल.