या देशात फिरताना कोरोना झाला तर सरकारच करणार तुमचा खर्च

कोरोना व्हायरस महामारी संकटामुळे अनेक देशात अद्याप लॉकडाऊन कायम आहे. सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेवर याचा वाईट परिणाम झाला असून, अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. काही देश पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी खास योजना देखील राबवत आहेत. यूरोपियन देश सायप्रसने पर्यटकांना आकर्षित करण्यास सुरूवात केली असून, पर्यटकांना बोलविण्यासाठी या देशाने खास ऑफर देण्यास सुरूवात केली आहे.

Image Credited – Travel Off Path

या देशाच्या सरकारने म्हटले आहे की जर त्यांच्या देशात एखादा पर्यटक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास, त्याचा सर्व खर्च सरकार करेल. कोरोना रुग्णाच्या येण्या-जाण्याचे भाडे, हॉटेलचे बिल आणि औषधासह खाण्या-पिण्याची सर्व व्यवस्था सरकार करेल.

Image Credited – The Moscow Times

सायप्रसचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, त्यांचा देश पर्यटकांना सुरक्षित वाटावा व त्यांनी महामारीला घाबरू नये अशी त्यांची इच्छा आहे. सायप्रसच्या एकूण अर्थव्यवस्थेचा 15 टक्के हिस्सा पर्यटनातूनच येतो.

Image Credited – Daily Express

दरम्यान, आतापर्यंत या देशात 1000 पेक्षा कमी कोरोनाग्रस्त आढळले असून, 17 लोकांचा मृत्यू झाला आहे. येथील सरकार पर्यटनावर लादलेले निर्बंध हळूहळू हटवण्याचा विचार करत आहे.

Leave a Comment