परग्रहावरील जीवांबाबत मनुष्याला खूपच उत्सुकता असते. अनेक देश याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न देखील करत आहेत. आता लवकरच चीन देखील एलियन्सचा शोध घेण्यास सुरूवात करणार आहे. यासाठी चीन आपल्या सर्वात मोठ्या टेलिस्कोपची मदत घेणार आहे. यासाठी एक्स्ट्राटेरेस्ट्रियल इंटेलिजेंसच्या (एसईटीआय) वैज्ञानिकांनी तयारी सुरू केली असून, वैज्ञानिकांनी अंतराळात एलियन्सचा शोध घेण्यासाठी 500 मीटर अपर्चर स्फेरिअल टेलिस्कोपचा (फास्ट) उपयोग करण्याची योजना बनवली आहे. सप्टेंबरपासून चीन एलियन्सचा शोध घेण्यास सुरूवात करणार आहे.
आता चीन शोधणार एलियन्स, घेणार या टेलिस्कोपची मदत

फास्ट टेलिस्कोपच्या निर्मितीचे कार्य 2011 सुरू झाले होते व याचे काम 2016 मध्ये पुर्ण झाले होते. या वर्षी जानेवारीमध्ये टेलिस्कोपचा वापर सुरू झाला आहे. वैज्ञानिकांनी रेडिओ फ्रिक्वेंसीमुळे येणाऱ्या अडचणींना हटवण्याचे काम सर्वात आधी केले होते. त्यामुळे अंतराळातून पृथ्वीवर येणाऱ्या एलियन्सच्या सिग्नलला शोधता येईल.

चीनच्या वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, या टेलिस्कोपच्या मदतीने एलियन्ससोबत संवाद स्थापित करता येईल. ते पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या सर्व फ्रिक्वेंसीला फिल्टर करून अंतराळातून येणाऱ्या सिग्नलला ओळखण्याचे काम करत आहेत.

चीनच्या एसईटीआय प्रोजेक्टचे वरिष्ठ वैज्ञानिक झांग तोंगजी यांनी सांगितले की, एलियन्स शोधण्याचे मिशन सप्टेंबर 2020 पासून सुरू होईल. या प्रोजेक्टमुळे जगभरातील इतर प्रोजेक्ट्सला कोणतेही नुकसान पोहचणार नाही. फास्ट टेलिस्कोपद्वारे इतर अंतराळसंबंधी मिशन देखील सुरू राहतील.