आनंद महिंद्रांना भारतात लाँच करायची आहे ही तीनचाकी स्कूटर

महिंद्रा ग्रुपच्या मालकीची फ्रेंच कंपनी प्यूजियटची ‘मेट्रोपोलिस’ थ्रीव्हिलकर स्कूटर गुआंग्डोंग पोलिसांच्या स्वॅट टीमच्या ताफ्यात सहभागी झाली आहे. या बाबतची माहिती महिंद्रा टूव्हिलर्स प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ प्रकाश वकानकर यांनी ट्विटरवर दिली. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रांचे लक्ष देखील या तीनचाकी वाहनाने खेचून घेतले.

आनंद महिंद्रांनी प्रकाश वकानकर यांचे ट्विट रिट्विट करत लिहिले की, हे मॉन्स्टर नेहमीच आवडते. प्युजियट मोटारसायकल्सचे मेट्रोपोलिस स्कूटर स्वॅट टीमसाठी एक रथ म्हणून नक्कीच चांगले काम करेल. भारतात देखील अशी स्कूटर हवी आहे. फ्रेंच सरकार पाठवेल का ? भारतासाठी या तीन चाकीच्या स्वस्त व्हेरिएंटविषयी देखील त्यांनी प्रकाश यांना विचारले.

Image Credited – NDTV

मेट्रोपोलिस तीनचाकी स्कूटर काही वर्षांपुर्वी चीनी बाजारात लाँच झाली होती. स्कूटरचा वेगळा लूकच याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. स्कूटरला पुढील बाजूला ट्विट हेडलँम्पससह मोठे एप्रॉन देण्यात आले आहे. स्कूटरमध्ये 400सीसी पॉवरमोशन एलएफई इंजिन देण्यात आले असून, हे इंजिन 35बीएचपी पॉवर आणि 38एनएम टॉर्क जनरेट करते. स्कूटर ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससोबत येते. प्युजियट मेट्रोपोलिस स्कूटरमध्ये ब्रेकिंग सिस्टम आणि अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम फीचर्स देखील मिळतात. भारतीय बाजाराचा विचार केला तर प्युजियट मेट्रोपोलिस स्कूटर लवकर भारतात येण्याची शक्यता कमी आहे. अशा स्कूटर्सचा ट्रेंड भारतात अद्याप यायचा आहे.

Leave a Comment