किआ मोटर्सने आधीच्या मॉडेलपेक्षा अधिक शानदार फीचर्स देत 2020 सेल्टोसला भारतात लाँच केले आहे. 2020 किआ सेल्टॉलसची एक्स शोरूम किंमत 9.89 लाख रुपये ते 17.34 लाख रुपये आहे. कंपनीने नवीन फीचर्स दिले असले तरी किंमत जुन्या मॉडेलप्रमाणेच ठेवली आहे. कंपनीनुसार नवीन मॉडेलमध्ये 10 नवीन फीचर्स देण्यात आले असून, जे या कारच्या सुरक्षा, सुविधा आणि कनेक्टिव्हिटीसोबत डिझाईनला अधिक शानदार बनवतात. सेल्टोसच्या बेस व्हेरिएंटमध्ये देखील कंपनीने अनेक बदल केले आहेत. कंपनीने कारच्या लाईन अपमधून स्मार्टस्ट्रीम पेट्रोल 4-लीटर टी-जीडीआई जीटीके आणि जीटीएक्स 7-स्पीड डीसीटी व्हेरिएंट्स बंद केले आहेत.
दमदार फीचर्ससह लाँच झाली 2020 किआ ‘सेल्टोस’
नवीन फीचर्सबद्दल सांगायचे तर 2020 किआ सेल्टोसच्या सर्व व्हेरिएंटमध्ये इमर्जेंसी स्टॉप सिग्नल फीचर मिळेल. यात ताशी 55 किमीपेक्षा अधिक वेगात अचानक ब्रेक लावल्यावर आपोआप मागील लाईट सुरू होते. एसयूव्हीच्या एचटीएक्स, एचटीएक्स प्लस आणि जीटीएक्स, जीटीएक्स प्लस व्हेरिएंट्समध्ये यूव्हीओ कनेक्टेड तंत्रज्ञानांतर्गत 8 फीचर्स देण्यात आलेले आहेत. यात वॉइस असिस्ट वेकअप कमांड – हेल्लो किआ, स्मार्टफोन अॅप कनेक्टिव्हिटी, यूव्हीओ लाईट देण्यात आली आहे जी एअर प्यूरिफायर, वॉइस असिस्ट भारतीय सुट्ट्यांची माहिती, क्रिकेट स्कोरची माहिती देईल. कारमध्ये डॅशबोर्डवर ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोलच्या बाजूला डेको पॅनेल सिल्वर ग्रार्निश देण्यात आले आहे.
याशिवाय 2020 किआ सेल्टोस एचटीएक्स प्लस आणि टीजीएक्स प्लस ट्रिम्ससोबत आता ड्युअल टोन पर्याय आणि सनरूफ मिळेल. या व्हेरिएंट्ससाठी नवीन ड्युअल टोन ऑरेंज/व्हाईट रंग उपलब्ध करण्यात आला आहे. सेल्टोसच्या सर्व व्हेरिएंटसोबत आता स्मार्ट की रिमोट स्टार्ट इंजिन मिळेल. एसयूव्हीच्या एचटीएक्स आणि जीटीएक्स व्हेरिएंट्समध्ये आता सनरूफसोबत एलईडी रूम लँम्प, मॅटेल स्कफ प्लेट्स आणि ड्युअल मफलर डिझाईन देण्यात आली आहे. याशिवाय सर्व व्हेरिएंट्समध्ये फ्रंट ट्रे आणि यूएसबी चार्जर मिळेल.
एसयूव्हीच्या इंजिनबद्दल सांगायचे तर यात कार के साथ समान स्मार्टस्ट्रीम 1.5-लीटर नेच्युरली एस्पिरेटेड आणि 1.4-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. याशिवाय एसयूव्हीमध्ये 1.5-लीटर सीआरडीआय व्हीजीटी डिझेल इंजिन मिळेल. कंपनीने सर्व इंजिनसोबत 6-स्पीड मॅन्यूअल, 6-स्पीड ऑटोमॅटिक, आयव्हीटी आणि 7डीसीटी ट्रांसमिशन पर्याय दिले आहेत.