जगात सर्वप्रथम येथे बनले महिलांसाठी खास पीपीई किट

फोटो साभार गुजराथी समाचार

करोनाच्या लढाईत फ्रंटलाईन वॉरीअर्सना पीपीई किटचा वापर अपरिहार्य ठरला असताना गुजराथच्या सुरत मध्ये जगात सर्वप्रथम महिलांना सहजतेने वापरता येईल असे पीपीई किट बनविले गेले आहे. नारी कवच कोविड १९ असे नाव या किट ला दिले गेले आहे.

करोना लढाईत सामील असलेल्या महीला हेल्थ वर्कर्स हे किट साडी, सलवार कुर्ता अथवा पँटवर वापरू शकणार असून ते वारंवार उघडणे किंवा बदल्याची गरज राहणार नाही अश्या पद्धतीने बनविले गेले आहे. आत्मनिर्भर भारत अभियान मोहिमेअंतर्गत या किटची निर्मिती केली गेली असून मेडिकल लॅब सिट्राने या किटला मंजुरी दिली आहे.

फॅशन डिझायनर विकास केंद्र फॅशन नोवा शी संबंधित डिझायनर सौरव मंडळ यांनी ही किट डिझाईन केले आहे. हे किट घालायला सहज, पूर्ण सुरक्षित असून ते घातलेले असताना टॉयलेट मध्ये जाण्याची वेळ आली  तरी काढावे लागत नाही. महिला आणि पुरुष दोघेही हे किट वापरू शकतात. सध्या उपलब्ध असलेली किट मध्येच टॉयलेट मध्ये जाण्याची वेळ आली तर पुन्हा वापरता येत नाहीत.

नारी कवच मध्ये लोअर हाफ मॉडीफाय करण्यात आला असून सिंगल पीस ऐवजी हे किट दोन भागात बनविले गेले आहे. त्याची किंमत ४०० ते ५०० रुपयादरम्यान आहे. मोदींनी मन की बात ट्विटर हँडलवर या किटचे कौतुक केले आहे तसेच वस्त्र मंत्री स्मृती इराणी यांनीही त्यावर रीट्विट केले आहे.

Leave a Comment