सॅनीटायझरच्या अतिवापराने त्वचारोगात वाढ

फोटो साभार जागरण

करोना कोविड साथीमुळे संक्रमण रोखण्यासाठी सॅनीटायझरचा वापर करण्याचा सल्ला वेळोवेळी दिला जात असला तर या सॅनीटायझरच्या अति वापराने त्वचा रोगात वाढ होऊ लागल्याचे समोर येऊ लागले आहे. सॅनीटायझरने दिवसात १०-१५ वेळा हात स्वच्छ करणाऱ्यांना हाताची जळजळ, त्वचेवर लाल चट्टे येणे, खाज सुटणे असे त्रास सुरु झाले असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे डॉक्टर आता सतत सॅनीटायझरचा वापर करून नका तर साध्या साबणाने हात धुवा असा सल्ला देत आहेत.

जे लोक तीन महिन्यापेक्षा अधिक काळ सॅनीटायझर वापरत आहेत त्यांच्यात अन्य समस्याही दिसू लागल्या आहेत. अजून सरसकट सर्व दवाखाने सुरु झालेले नाहीत. ते सुरु झाल्यावर या रुग्णांची संख्या वाढेल असा अंदाज वर्तविला जात आहे. मार्च पूर्वी फक्त डॉक्टर्स आणि मेडिकल क्षेत्राशी संबंधित व्यक्ती सॅनीटायझरचा वापर करत असत. मात्र करोना फैलाव झाल्यापासून सॅनीटायझरचा सतत आणि मोठ्या प्रमाणावर बहुसंख्य लोक वापर करू लागले आहेत.

सॅनीटायझर मध्ये अल्कोहोल आहे आणि त्याचा अति वापर त्वचेसाठी नुकसानकारक होतो आहे. सुरवातीला अॅलर्जी म्हणून त्वचेच्या या तक्रारींकडे पाहिले गेले पण आता त्याचे खरे स्वरूप दिसू लागले आहे.

पुरुषांच्या तुलनेत महिलांची त्वचा नाजूक असते. त्यामुळे सॅनीटायझरचा अति वापर महिलांना त्रासदायक होत आहे. लहान मुलांची त्वचाही सॅनीटायझर मुळे खरबरीत होताना दिसते आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा सॅनीटायझरचा वापर मर्यादित ठेवावा असा सल्ला दिला आहे. करोना प्रभावित भागातून आल्यासच सॅनीटायझर वापरा अन्यथा साबणाने हात धुवा असा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने १८ एप्रिल रोजीच जारी केला आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment