ऑस्ट्रेलिया पंतप्रधानांना मोदींसह घ्यायचा आहे सामोश्याचा आस्वाद

फोटो साभार जागरण

भारतीय खाद्यपदार्थ जगभरात आवडीने खाल्ले जातात आणि त्यामुळे जगात भारतीय पदार्थांचा मोठा बोलबालाही आहे. सर्वसामान्य जनतेपासून ते अगदी सेलेब्रिटी पर्यंत भारतीय पदार्थ लोकप्रिय आहेत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॉरिसन यानाही भारतीय समोसा असाच प्रिय आहे. मात्र त्यांना या चटकदार सामोश्याचा आस्वाद पंतप्रधान मोदी यांच्यासह घेण्याची इच्छा आहे.

स्कॉट मॉरिसन हे समोसा शौकीन आहेत आणि त्यांनी सामोश्याचा आस्वाद घेतानाचा स्वतःच एक फोटो रविवारी ट्विटर वर शेअर केला आहे. त्याच्या खाली कॅप्शन लिहिताना त्यांनी भारतीय सामोश्याचे संडे स्कामोसा असे नामकरण केल्याचे आणि आंब्याच्या चटणीसह हा समोसा म्हंजे संडे स्कामोसा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्यासह खाण्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे. ते पुढे लिहितात समोसा शाकाहारी आहे त्यामुळे मोदी खाऊ शकतील.

या आठवड्यात मोदी आणि मॉरिसन यांच्यात व्हिडीओ लिंकद्वारे द्विपक्षीय चर्चा होणार आहे त्याचा या ट्विटशी संबंध आहे. मॉरिसन यांनी त्यात मोदी यानाही टॅग केले आहे. मोदींनी त्याला प्रतिसाद देताना हिंद महासागराला जोडलेल्या या देशांची सामोश्यामुळे एकजूट दिसते आहे असे लिहिताना, दिसायला तरी समोसा स्वादिष्ट वाटतो आहे असे म्हटले आहे. मोदी लिहितात, कोविड १९ वर निर्णायक विजय मिळविल्यावर या सामोश्यांचा आस्वाद घेऊ. तो पर्यंत चार तारखेच्या मिटींगची वाट पाहत आहे. या चर्चेत सैन्य, विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रात द्विपक्षीय करार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Leave a Comment