आईच्या हाताच्या जेवणासाठी ट्विंकलला ४६ वर्षे पहावी लागली वाट

फोटो साभार नई दुनिया

बॉलीवूड खिलाडी अक्षयकुमार याची पत्नी, अभिनेत्री आणि चांगली लेखिका ट्विंकल खन्ना हिला आई डिम्पल हिच्या हाताच्या पदार्थांची चव घेण्यासाठी तब्बल ४६ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. करोना संक्रमण आणि लॉकडाऊन यामुळे डिम्पल खन्नाने प्रथमच घरी स्वयंपाक करून ट्विंकल साठी फ्राईड राईस बनविल्याचा फोटो ट्विंकलने शेअर केला आहे.

यावर चेष्टेने लिहिताना ट्विंकल म्हणते, आईच्या हाताच्या जेवणाची स्तुती मी अनेकांकडून ऐकली आहे. मला मात्र माझ्या आईच्या हाताचा पदार्थ खाण्यासाठी ४६ वर्षे वाट पहावी लागली. आईने स्वयंपाक करायला सुरवात करावी यासाठी करोना सारखी महामारी आणि लॉकडाऊनची गरज पडली. सतत वाढणाऱ्या लॉकडाऊन मुळे मला आईच्या हाताच्या फ्राईड राईसची चव घेता आली.

खिलाडी अक्षयकुमार आणि त्याचा मुलगा आरव हे दोघेही उत्तम कुक आहेत. अक्षय बॉलीवूड मध्ये येण्याअगोदर प्रोफेशनल कुक म्हणून काम करत होता. आरवनेही कुटुंबासाठी नुकतेच काही पदार्थ बनविले होते त्याचे फोटो ट्विंकलने शेअर केले होते.

Leave a Comment