राज्यपालांनी घेतली सोनू सूदच्या कामाची दखल


शनिवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची स्थलांतरित मजुरांसाठी देवदूत ठरलेल्या अभिनेता सोनू सूदने भेट घेतली. सोनू सूदला राजभवनावर भेटायला राज्यपालांनी बोलावले होते. राज्यपालांनी या भेटीदरम्यान सोनू सूदच्या कामाचे कौतुक केले. सोनू सूद गेल्या काही दिवसांपासून लॉकडाउनमुळे विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी बसेसची व्यवस्था करून त्यांना सुखरुप घरी पोहोचवण्याचे काम करत आहे.


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सोनू सूदने राजभवन येथे भेट घेतली. राज्यपालांना स्थलांतरित लोकांना त्यांच्या मूळ राज्यात पोहचविण्यासाठी तसेच लाखो लोकांच्या भोजन व्यवस्थेसाठी त्याने केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली, असे ट्विट राज्यपालांनी केले आहे. सर्वच स्तरांतून सोनू सूदच्या कामाचे कौतुक होत आहे. पडद्यावर खलनायकी व्यक्तिरेखा साकारणारा सोनू सूद आता खऱ्या आयुष्यात स्थलांतरित मजूरांबरोबर देशातील जनतेसाठी नायक ठरला आहे.

Leave a Comment