मुख्यमंत्र्यांनी मानले सलमान खानचे आभार


कोरोना सारख्या महामारीचा देशातील सर्वच नागरिक सामना करत आहेत. तर या महामारीमुळे नागरिकांच्या मनात भीती देखील आहे. तर कोरोनामुळे देशरात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर उद्योगधंदे बंदल असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पण या काळात देशातील जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस आणि डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी जीवाची तमा न बाळगता काम करत असल्यामुळे मुंबई पोलिसांमध्ये अभिनेता सलमान खान याने सॅनिटायझरचे वाटप केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याचा हा स्तुत्य उपक्रम पाहून ट्विटरच्या माध्यमातून त्याचे आभार मानले आहेत.


कोरोनाला हरवण्याचे एकमेव अस्त्र म्हणजे शारीरिक स्वच्छता बाळगणे आणि हे आता देशातील सर्वच नागरिकांना चांगल्याप्रकारे ठाऊक झाले आहे. या काळात हात स्वच्छ ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे प्रत्येकजण या काळात सॅनिटायझर विकत घेण्यावर जोर देत आहे. सॅनिटायझरची मागणी एकाच वेळी वाढल्यामुळे बाजारात त्याच्या किंमतीही कमालीच्या वाढल्या आहेत. त्यामुळे आपल्या ‘फ्रेश’ (FRSH) या कंपनीत तयार करण्यात आलेले जवळपास १ लाख सॅनिटायझर सलमान खानने पोलिसांमध्ये वाटले. मुख्यमंत्र्यांनी त्याची ही कामगिरी पाहून त्याचे आभार मानत या कौतुकास्पद पुढाकारासाठी आपले आभार मानतो, असे म्हटले आहे.

दरम्यान, अलिकडेच सलमान खानने ‘फ्रेश’ (FRSH) नावाची एक कंपनी सुरु केली असून त्याने या कंपनीत तयार झालेले १ लाख सॅनिटायझर मुंबई पोलिसांना भेट म्हणून दिले आहेत. सलमानने ही नवीन कंपनी लॉकडाउनच्या काळात घरी राहून सुरु केली आहे. बॉडी स्प्रे, परफ्युम, साबण आणि सौंदर्य प्रसाधने यांची निर्मिती या कंपनीमध्ये केली जाणार आहे. दरम्यान, लवकरच बाजारात सलमानच्या फ्रेश या ब्रॅण्डचे प्रोडक्ट्स विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. पण सध्याची परिस्थिती पाहता सॅनिटायझरची सर्वाधिक गरज असल्यामुळे फ्रेश सॅनिटायझर बाजारात उपलब्ध झाले आहे.

Leave a Comment