‘मन की बात’; ट्रॅक्टरद्वारे गावात सॅनिटायझरची फवारणी करणाऱ्या नाशिकच्या शेतकऱ्याचे कौतुक


नवी दिल्ली : अनेक सर्वसामान्य नागरिक कोरोनाविरोधातील लढाईत आपआपल्यापरीने जनतेची सेवा करत आहे. जनतेच्या सेवेसाठी ते स्वत:हून पुढे आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा नागरिकांचे कौतुक केले. यामध्ये पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील सटाण्याचे शेतकरी राजेंद्र यादव यांचेदेखील कौतुक केले.

आज सकाळी 11 वाजता देशातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे संबोधित केले. त्यांनी यावेळी राजेंद्र जाधव यांच्या कामांचे कौतुक केले. आपल्या ट्रॅक्टरला राजेंद्र यादव यांनी सॅनिटायझर मशीन बसवले आहे. ते संपूर्ण गावात या मशीनद्वारे सॅनिटायझरची फवारणी करतात. त्यांच्या याच कामाची दखल पंतप्रधान मोदी यांनी घेतली.

कोरोनाविरोधाच्या लढाईत देशभरातील छोट्या गावांपासून शहरांपर्यंत, छोट्या ते मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत, लॅब नव्या पद्धतीने लढत आहेत. त्याचबरोबर नवे संशोधन करत आहेत. याबाबतीत नाशिकचे राजेंद्र यादव यांचे उदाहरण आवर्जून घ्यावसे वाटते. नाशिकच्या सटाणा गावाचे राजेंद्र हे शेतकरी आहेत. आपल्या गावाला कोरोनापासून वाचवण्यासाठी त्यांनी त्यांच्या ट्रॅक्टरला एक सॅनिटायझर मशीन बसवले आहे. ते संपूर्ण गावात या मशीनद्वारे सॅनिटायझरची फवारणी करतात. खूप प्रभावितपणे हे मशीन काम करत असल्याचे मोदी म्हणाले.

आपल्याकडे ‘सेवा परमो धर्म, असे म्हटले जातं. सेवेतच सुख आहे. दुसऱ्याच्या सेवेत लागलेल्या व्यक्तीत कोणत्याही प्रकारचे नैराश्य किंवा यातना नसते. अशा व्यक्तीच्या जीवनात आणि त्याच्या दृष्टीकोनात नेहमी आत्मविश्वास दिसतो. या व्यक्तीमध्ये नेहमी सकारात्मकता दिसते. आपले डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, सफाईकामगार, मीडिया कर्मचारी हे सर्व सेवा करत असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले.

आपले सगळे सेवामध्ये समर्पित करणाऱ्या लोकांची संख्या अगणित आहे. असेच एक तमिळनाडूचे सी. मोहन नावाचे सज्जन गृहस्थ आहेत. एक सलून सी मोहनजी चालवतात. त्यांनी त्यांच्या मेहनतीच्या कमाईने आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी 5 लाख रुपये वाचवून ठेवले होते. ती सर्व रक्कम त्यांनी गरिब आणि होतकरु नागरिकांसाठी खर्च केल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

त्याचबरोबर पंजाबचे पठाणकोट येथे देखील असेच एक उदाहरण मला माहिती पडले. तेथील दिव्यांग राजूने दुसऱ्याच्या मदतीने मिळालेल्या पैशांमध्ये 3 हजार मास्क बनवून वाटले. जवळपास 100 परिवारांना त्याने रेशनदेखील पुरवले. अशाचप्रकारे ठेला लावून आपला उदरनिर्वाह भागवणारे गौतम दास दररोज सध्या गरजूंसाठी जेवणाची व्यवस्था करत असल्याचे, मोदींनी सांगितले.

देशभरातील विविध गावांमध्ये हजारो महिला मास्क बनवत आहेत. त्यांना या कामात अनेक सामाजिक संस्था मदत करत आहेत. दररोज असे कित्येक उदाहरण दिसत आहेत. नमो अॅपद्वारे ते आपले अनुभव शेअर करत आहे. बऱ्याचदा मी अनेकांचे नाव घेऊ शकत नाही. पण त्या सर्वांचा मी आदर करतो, असे मोदी म्हणाले.

Leave a Comment