रोहित शर्माची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

फोटो साभार जागरण

टीम इंडियाचा सलामी फलंदाज रोहित शर्मा याची बीसीसीआयने यावर्षीच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली असून गेल्या चार वर्षातील त्याच्या शानदार कामगिरीमुळे तो या पुरस्काराचा हक्कदार असल्याचे म्हटले आहे. रोहित हा पुरस्कार मिळविणारा चौथा क्रिकेटपटू ठरणार आहे.

वनडे सामन्यात तीन वेळा द्विशतक करणारा रोहित जगातील एकमेव फलंदाज असून टी २० मध्ये त्याने चार शतके काढली आहेत. हेही जागतिक रेकॉर्ड आहे. इंग्लंड येथे खेळल्या गेलेल्या २०१९ विश्वचषक स्पर्धेत रोहितच्या नावावर पाच शतके असून एकाच सिझन मध्ये अशी कामगिरी करणारा रोहित पहिला खेळाडू आहे. त्याच्या सर्वाधिक धावा २२४ आहेत. वनडे मध्ये त्याच्या एकूण ९११५ धावा आहेत त्यात २९ शतके आणि ४३ अर्धशतके आहेत. १०८ टी २० मध्ये त्याने २७७३ धावा काढल्या आहेत.

फोटो साभार जागरण

सर्वप्रथम राजीव गांधी खेलरत्न मिळविणाऱ्या क्रिकेटपटूचा सन्मान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याला मिळाला असून त्याला हा पुरस्कार १९९८ मध्ये दिला गेला. त्यानंतर २ विश्वकप भारताला जिंकून देणारा टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी याला हा पुरस्कर २००८ मध्ये दिला गेला तर २०१८ मध्ये हा पुरस्कार टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली याला दिला गेला आहे.

Leave a Comment