स्पाईसजेटला ड्रोन सामान डिलीव्हरीसाठी परवानगी

फोटो साभार झी न्यूज

डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एव्हीएशन (डीजीसीए)ने स्थानिक विमान कंपनी स्पाईसजेटला ड्रोन च्या मदतीने आवश्यक औषधे आणि जरुरी सामान पोहोचविण्याची सेवा सुरु करण्यास परवानगी दिली असून लवकरच त्याच्या चाचण्या सुरु होत असल्याचे समजते. स्पाईसजेट त्यांची सहयोगी कंपनी स्पाईस एक्सप्रेसच्या माध्यमातून ड्रोन डिलीव्हरी सेवा सुरु करत आहे.

अमेरिकेसारख्या विकसित देशात गरजेच्या वस्तू ड्रोन डिलीव्हरीने पोहोचविण्याची सुरवात यापूर्वीच झाली आहे. आता भारतात सुद्धा ही सेवा सुरु होत आहे. यामुळे आवश्यक आणि गरजेच्या वस्तू, औषधे ग्राहकांना त्वरित उपलब्ध होऊ शकणार आहेत. करोना संक्रमण संकटात अश्या डिलीव्हरी माध्यमांवर विचार सुरूच होता. ड्रोन डिलीव्हरी मुळे संक्रमण फैलावणे कमी होणार आहे शिवाय कमी खर्चात आणि त्वरित ग्राहकांना आवश्यक वस्तूंचा पुरवठा होऊ शकणार आहे.

सरकारने प्रथमच ड्रोन डिलीव्हरी चाचणी करण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे कारण देशात अजूनही करोना संक्रमणाचा जोर आहे. त्यामुळे घरपोच सामान सेवा ही समस्या बनली आहे. स्पाईसजेट पूर्वी अनेक कंपन्यांनी ड्रोन सेवा सुरु करण्यासाठी सरकारकडे परवानगी मागितली होती. ई कॉमर्स कंपनी अमेझॉनने सुद्धा अशी परवानगी मागितली असल्याचे समजते.

Leave a Comment