फेडरर ठरला जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू, तर विराट कोहली या स्थानावर

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सलग चौथ्या वर्षी फॉर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 100 खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे. या यादीत विराट हा एकमेव क्रिकेटर आणि भारतीय आहे. मागील वर्षी 189 कोटींच्या कमाईसह 100 व्या स्थानावर असलेला कोहली यंदा 197 कोटी रुपयांसह 66व्या स्थानावर आहे. एक वर्षात विराटच्या कमाईत 8 कोटींनी वाढ झाली आहे. यात 182 कोटी जाहिरात आणि 15 कोटी पगार व विजयाची रक्कम आहे. 2018 मध्ये विराट 83 आणि 2017 मध्ये 89व्या स्थानावर होता.

Image Credited – Amarujala

जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या यादीत स्विर्झलँडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर या वर्षी पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो आणि अर्जेंटिनाच्या लियोनल मेस्सीला मागे टाकले आहे. फेडरर पहिल्यांदा 802 कोटी रुपयांसह (106.3 मिलियन डॉलर) पहिल्या स्थानावर आहे.  मागील वर्षी फेडरर 5व्या स्थानावर होता. एका वर्षात त्याच्या कमाईत 98 कोटींनी वाढ झाली आहे.

Image Credited – Goal.com

मागील वर्षी पहिल्या स्थानावर असलेला लियोनल मेस्सी यंदा 786 कोटी रुपयांसह (104 मिलियन डॉलर) तिसऱ्या स्थानावर आहे. तर रोनाल्डो 794 कोटींसह (105 मिलियन डॉलर) दुसऱ्या स्थानावर आहे.

सर्वाधिक कमाई करणारे टॉप 10 खेळाडू –

  1. रॉजर फेडरर (टेनिस) – 802 कोटी रुपये
  2. ख्रिस्टियानो रोनाल्डो (फुटबॉल) – 794 कोटी रुपये
  3. लियोनल मेस्सी (फुटबॉल) – 786 कोटी रुपये
  4. नेमार (फुटबॉल) -722 कोटी रुपये
  5. लेब्रॉन जेम्स (बास्केटबॉल) – 667 कोटी रुपये
  6. स्टिफन करी (बास्केटबॉल) – 563 कोटी रुपये
  7. केव्हिन ड्युरेंट (बास्केटबॉल) – 483 कोटी रुपये
  8. टायगर वूड्स (गोल्फ) – 471 कोटी रुपये
  9. किर्क कजंस (एनएफएल) – 457 कोटी रुपये
  10. कर्झन वेंट्झ (एनएफएल) – 446 कोटी रुपये

Leave a Comment