व्हिडीओ : वस्तूंवर बहिष्कार टाकून चीनला धडा शिकवा – सोनम वांगचुक

शिक्षणतज्ञ आणि इनोव्हेटर सोनम वांगचुक यांचा चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लद्दाख भागात भारत-चीनमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाला आहे. या पार्श्वभुमीवर त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. आपल्या व्हिडीओमध्ये त्यांनी चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची आणि चीनी अ‍ॅप अनइंस्टॉल करण्याची मागणी केली आहे. त्यांनी ‘चीनला सैन्य बुलेटद्वारे, तर नागरिक वॉलेटद्वारे उत्तर देईल’ अशा आशयाच्या टायटल खाली युट्यूबवर व्हिडीओ शेअर केला आहे.

या परिस्थितीमध्ये नागरिक देशाची कशी मदत करू शकतील हे त्यांनी आपल्या व्हिडीओमध्ये सांगितले आहे. ते म्हणाले की, एका आठवड्यात सॉफ्टवेअर आणि एका वर्षात हार्डवेअर वापरणे बंद करणार आहे. यंदा भारताच्या बुलेट पॉवर पेक्षा, वॉलेट पॉवर अधिक कामास येईल. जर भारतासह आजुबाजूच्या देशांनी चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकल्यास याचा चीनच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल. याचा तेथील नागरिकांना त्रास होऊल व कदाचित ते सरकार पाडतील.

त्यांनी स्पष्ट केले की ते चीनी नागरिकांच्या विरोधात नसून, चीनच्या सरकारविरोधात आहेत. चीन सरकारच्या प्रशासनात बदल गरजेचे आहे. आपल्या 9 मिनिटांच्या व्हिडीओमध्ये त्यांनी चीनमुळे भारतासह आजुबाजूच्या देशांनाही कशी समस्या होत आहे हे सांगितले.

Leave a Comment