काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना लॉकडाऊनची परिस्थिती नीट हाताळली नाही म्हणून सरकारवर टीका केली होती. राहुल गांधींच्या या आरोपांना आता केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी उत्तर दिले आहे. प्रसाद म्हणाले की, राहुल गांधींचे तर त्यांचे स्वतः मुख्यमंत्री ऐकत नाही. एकतर त्यांच्या शब्दांना वजन नाही किंवा त्यांच्या बोलण्याला त्यांचेच मुख्यमंत्री गंभीरतेने घेत नाहीत.
राहुल गांधींच्या शब्दांना वजन नाही, त्यांचे मुख्यमंत्री देखील त्यांच ऐकत नाही – रविशंकर प्रसाद
एका खाजगी चॅनेलशी बोलताना प्रसाद म्हणाले की, ही एकत्र येण्याची वेळ आहे. राजकारण तर नंतर देखील करता येईल. राहुल गांधींनी लॉकडाऊनला विरोध केला. कोरोना योद्धांच्या सन्मानार्थ टाळी-थाळी वाजवण्याचा, दिवे लावण्याचा विरोध केला. प्रश्न हा आहे की राहुल गांधींचे म्हणणे त्यांचेच मुख्यमंत्री का ऐकत नाहीत ? पंजाब, राजस्थान, महाराष्ट्रात सर्वांनी आधीच निर्णय घेतले.

रविशंकर प्रसाद म्हणाले की केंद्र सरकार कामगारांची समस्या कमी करण्याचा पुरेपुर प्रयत्न करत आहे. 3500 गाड्या, 3 महिने जेवण, 11 हजार कोटींचा निधी आणि मनरेगासाठी 40 हजार कोटी रुपये सरकारने दिले आहेत.