पंजाब पोलिसांच्या टिकटॉक व्हिडीओमुळे मुलाची झाली हरवलेल्या वडिलांशी भेट

पंजाब पोलीस दलातील कॉन्स्टेंबल अजायब सिंह यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिंह यांनी मार्च महिन्यात रस्त्यावर फिरणाऱ्या एका व्यक्तीला जेवण देतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओद्वारे रोडवर राहणाऱ्या गरीब, उपाशी लोकांची मदत करण्यासाठी इतरांना जागरूक करायचे होते. मात्र या व्हिडीओमुळे एका हरवलेल्या व्यक्तीला आपल्या कुटुंबियाशी भेट घडविण्यास मदत झाली आहे. व्हिडीओमध्ये दिसऱ्या व्यक्तीचे नाव वेंकटेश्वरलू आहे. दोन वर्षांपुर्वी ते हरवले होते. मात्र एका व्हायरल व्हिडीओमुळे पुन्हा त्यांची आपल्या कुटुंबियाशी भेट झाली आहे.

@goldypp99##punjabpolice ##virelvideos ##ranglapunjab ##waheguru♬ original sound – ਸਮਰੱਥ ਰੰਧਾਵਾ👑😎💪

वेंकटेश्वरलू वर्ष 2018 मध्ये कामासाठी तेलंगानावरून लुधियाना आले होते. मात्र ट्रक चालकाने त्यांना मध्येच सोडल्याने ते रस्ता भटकले होते. त्यांच्या कुटुंबाने तेलंगाना पोलिसांसोबत मिळून दोन वर्ष त्यांचा शोध घेतला, मात्र ते सापडले नाहीत. दोन वर्षांनंतर टिकटॉक व्हिडीओमध्ये त्यांच्या एका मित्राने त्यांना पाहिल्यानंतर कुटुंबाने पंजाब पोलिसांशी संपर्क केला. यानंतर दोन वर्षांनी वेंकटेश्वरलू यांची आपल्या कुटुंबियाशी भेट झाली.

@goldypp99##punjabpolice ##virelvideos ##ranglapunjab ##waheguru 🙏🙏😊😊♬ original sound – Satinder Sartaaj

वेंकटेश्वरलू यांचा मुलगा पेडिराजू त्यांना घेण्यासाठी स्पेशल परमिट काढून लुधियानाला पोहचला व त्यांना घेऊन आपल्या गावाला परतला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून, टिकटॉकवर 1.8 मिलियन पेक्षा अधिक युजरनी लाईक केले आहे.

Leave a Comment