शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात निर्णय घेण्याचा अधिकार केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे असल्याचे म्हटले आहे. आज तक चॅनेलशी बोलताना ते म्हणाले की तिन्ही पक्षांची विचारधारा वेगळी आहे. मात्र तिन्ही पक्ष एकत्र येऊन महाराट्रासाठी काम करत आहे. त्यामुळे विरोधी पक्षांना डोकेदुखी होत आहे. तिन्ही पक्षांमध्ये ताळमेळ नसल्याचा विरोधक चुकीचा आरोप करत आहेत.
महाराष्ट्रात निर्णय घेण्याचा अधिकार फक्त उद्धव ठाकरेंकडे – संजय राऊत

राऊत म्हणाले की, राहुल गांधी यांचे म्हणणे बरोबर आहे. त्यांचे नेते मोठ्या निर्णयामध्ये सहभागी नसतात. युतीमध्ये असेच काम होते, मग ते केंद्रात असो अथवा महाराष्ट्रात. अंतिम मुख्य निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतात. त्यांच्या निर्णयाबाबत आतापर्यंत कोणालाही अडचण आलेली नाही.

ते म्हणाले की, आम्ही भाजपसोबत 30 वर्ष होतो. आमच्यामुळे युती तुटली हा आरोप चुकीचा आहे. टाळी एका हाताने वाजत नाही. आम्ही प्रत्येक वाईट परिस्थितीमध्ये त्यांच्या सोबत होतो. मात्र भाजपला सत्तेचा लोभ आहे. सत्तेसाठी भाजप मैत्री तोडायला तयार झाला, त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर देताना राऊत म्हणाले की, त्यांनाही माहित आहे की सध्या राज्यात कशी स्थिती आहे. आता राजकारण विसरून सर्वांनी सोबत येण्याची गरज आहे. तेव्हाच एकत्र येऊनला कोरोनावर मात करता येईल.