टिकटॉकला टक्कर देणाऱ्या ‘मित्रों’ अ‍ॅपचे काय आहे पाकिस्तानी कनेक्शन ?

टिकटॉकला टक्कर देण्यासाठी पुढे आलेले मित्रों अ‍ॅप भारतीय नसून, पाकिस्तानचे असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानच्या सॉफ्टवेअर डेव्हलपर Qboxus चे हे अ‍ॅप असल्याचे एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे. टिकटॉकला टक्कर देणाऱ्या या अ‍ॅपला आतापर्यंत 50 लाखांपेक्षा अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आलेले आहे. मात्र आता हे अ‍ॅप पाकिस्तानी कंपनीद्वारे बनविण्यात आलेल्या टिकटिक अ‍ॅपचे रीपॅकेज्ड व्हर्जन असल्याचे सांगितले जात आहे.

Image Credited – CNBC

इरफान शेख Qboxus कंपनीचे संस्थापक आणि सीईओ आहेत. या कंपनीनेच टिकटिक अ‍ॅप बनवले आहे. इरफानने सांगितले की, मित्रों अ‍ॅपच्या डेव्हलपरला टिकटिकचा सोर्स कोड केवळ 34 डॉलर्सला (जवळपास 2,500 रुपये) विकण्यात आला आहे. त्यांची कंपनी सोर्स कोड विकत असते व त्यानंतर खरेदी करणारा त्यात बदल करत असतो. त्यांनी सांगितले की, आमचा मुख्य उद्देश लोकप्रिय अ‍ॅपचे क्लोन बनवून कमी किंमतीत विकणे हे आहे. आतापर्यंत टिकटिक अ‍ॅपचे 277 कॉपी विकल्या आहेत.

Image Credited – The Pigeon Express

इरफानने सांगितले की आम्हाला यात काहीही समस्या नाही. लोक स्क्रिप्टचे पैसे देतात व वापर करतात. हे योग्य आहे. मात्र लोक याला भारताने बनवलेले अ‍ॅप म्हणत आहे, ही समस्या आहे. हे सत्य नाही. खासकरून या अ‍ॅपमध्ये काहीही बदल करण्यात आलेला नाही. टिकटिकचे केवळ नाव बदलून मित्रों अ‍ॅप करण्यात आले आहे.

दरम्यान, मित्रों अ‍ॅप डेव्हलपरचे नाव अद्याप समोरे आलेले नाही. मात्र काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की हे अ‍ॅप आयआयटी रुडकीच्या विद्यार्थ्याने तयार केले आहे. या अ‍ॅपमध्ये कोणतीही प्रायव्हेसी पॉलिसी नसून यात अनेक बग असल्याच्या देखील तक्रारी आल्या आहेत. या अ‍ॅपमध्ये व्हिडीओ अपलोड केल्यानंतर डेटाचे काय होते, हे युजर्सला देखील माहिती नाही.

Leave a Comment