गुगलने आणले ‘सोशल डिस्टेंसिंग’ अ‍ॅप, एआरच्या मदतीने युजर्सला असे करणार सावधान

कोरोना व्हायरस संसर्गापासून वाचण्यासाठी सोशल डिस्टेंसिंगवर जोर दिला जात आहे. व्हायरसपासून बचावासाठी लोकांना एकमेंकामध्ये अंतर ठेवण्यास सांगितले जात आहे. आता यात मदत करण्यासाठी गुगलने खास सोशल डिस्टेंसिंग अ‍ॅप तयार केले आहे. ज्याच्या मदतीने लोक एकमेंकामध्ये दोन मीटरचे अंतर ठेऊ शकतील. गुगलचे हे अ‍ॅप ऑगमेंटेड रिएलिटीच्या (एआर) मदतीने युजर्सच्या आजुबाजूला एक व्हर्च्युल वर्तुळ तयार करेल. याच्यासाठी अ‍ॅप मोबाईलमधील कॅमेऱ्याची मदत घेईल.

गुगलच्या या अ‍ॅपचे नाव सोडार (Sodar) असून, याला सोशल डिस्टेंसिंग गाईडलाईन्स फॉलो करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. फोनच्या कॅमेऱ्याच्या मदतीने आजुबाजूला दोन मीटरचे एक वर्तुळ तयार होईल, हे वर्तुळ कॅमेऱ्यात पाहता येईल. दुसरी व्यक्ती दोन मीटर रेंजमध्ये आहे का हे देखील समजेल. दुसरी व्यक्ती या व्हर्च्युअल रिंगच्या आत आल्यावर अलर्ट मिळेल.

Image Credited – engadget

या अ‍ॅपचा वापर करण्यासाठी https://sodar.withgoogle.com/ वर जावे लागेल. येथे दिसणाऱ्या क्यूआर कोडला स्मार्टफोनने स्कॅन करावे लागेल. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर व्हर्च्युअल रिंग फीचर वापरता येईल. अद्याप हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध नसून, अँड्राईड डिव्हाईसवर गुगल क्रोम ब्राउजरच्या मदतीने काम करते.

Leave a Comment