मोदी 2.0 : सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने मोदींनी देशवासियांना लिहिले पत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळाला आज एक वर्ष पुर्ण झाले आहे. वर्षपूर्तीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी देशवासियांसाठी पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी सरकारद्वारे उचलण्यात आलेली पावले, योजना व मोठ्या निर्णयांबाबत माहिती दिली आहे. सोबतच कोरोना व्हायरसच्या लढाईत देश विजय मिळवेल व अर्थव्यवस्थेवरील संकट दूर होईल अशी आशा व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदींनी मागील वर्षी लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवत दुसऱ्यांदा 30 मे रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती.

 

पंतप्रधान मोदींच्या पत्रातील 10 महत्त्वाचे मुद्दे –

  1. मोदींनी आपल्या पत्रात लिहिले की सामान्य स्थितीमध्ये ते लोकांमध्ये असतात. मात्र सध्याच्या कोरोना व्हायरस स्थितीमुळे असे शक्य नाही. त्यामुळे पत्राच्या माध्यमातून लोकांचा आशिर्वाद घेण्यासाठी आले आहेत.
  2. पंतप्रधान मोदींनी सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या बहुमताला भारतीय लोकशाही इतिहासातील सुवर्णमय अक्षरांनी लिहिलेला इतिहास म्हटले आहे. अनेक दशकांनंतर सलग दुसऱ्यांदा सरकारला बहुमत दिल्याचे त्यांनी म्हटले.
  3. भारताने कोरोना व्हायरसच्या लढाईत आपली एकता आणि संकल्पद्वारे जगाला आश्चर्यचकित केले आहे व एक दृढविश्वास आहे की कोरोनावर मात करून देश अर्थव्यवस्था पुन्हा पुर्वपदावर आणून एक उदाहरण समोर ठेवेल.
  4. मोदी पत्रात म्हणाले की, भारतासह जगभरातील अर्थव्यस्था पुन्हा कशी सुरळीत होईल यावर चर्चा सुरू आहे. आत्मनिर्भर बनणे सध्याची गरज आहे. 20 लाख कोटींचे पॅकेज याच दिशेने एक पाऊल आहे.
  5. या कठीण काळात कोणाला समस्या, असुविधा झाली नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. श्रमिक, प्रवासी कामगार, छोटे उद्योगागत काम करणारे कारागिर, सामान विकणाऱ्या अशा अनेकांना कष्ट सहन करावे लागले. या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
  6. मोदींनी कलम 370 हटवणे, राम मंदिराचा मुद्दा सोडवणे, ट्रिपल तलाक आणि नागरिकत्व दुरूस्ती कायद्याला आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील सर्वात मोठी कामगिरी म्हटले आहे. ते म्हणाले की मागील एका वर्षातील त्यांचे हे निर्णय भारताला जागतिक नेता बनविण्याचे स्वप्न पुर्ण करण्याच्या उद्देशाने घेण्यात आले आहेत.
  7. मोदींनी आपल्या सरकारच्या भ्रष्टाचारविरोधी प्रतिमेवर जोर देत म्हटले की मागील 5 वर्षात देशाने पाहिले की प्रशासकीय यंत्रणेला भ्रष्टाचार आणि मनमानी कारभारापासून मुक्त केले आहे.
  8. आपल्या योजनांचा उल्लेख करत ते म्हणाले की, 2014 ते 2019 या काळात भारत मोठ्या प्रमाणात पुढे गेला आहे. गरीबांचे बँक खाते उघडून मोफत गॅस कनेक्शन, मोफत वीज कनेक्शन दिले. गरीबांसाठी शौचालय, घरे बांधली. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत प्रत्येक शेतकरी समावेश झाला आहे. मागील एका वर्षात 9.50 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 72 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. 15 कोटींपेक्षा अधिक ग्रामीण घरांना शुद्ध पाणी पाईपलाईनद्वारे मिळावे यासाठी जल जीवन मिशन सुरू केले.
  9. त्यांच्या कार्यकाळात सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक झाले. तर दुसरीकडे वन रँक वन पेंशन, वन नेशन वन टॅक्स, शेतकऱ्यांसाठी चांगली एमएसपी सारख्या दशक जुन्या मागण्या पुर्ण झाल्या.
  10. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ दर निर्माण केले व गगनयानसाठी देखील भारत तयारी करत आहे.

Leave a Comment