डब्ल्यूएचओशी संबंध तोडणार – ट्रम्प यांचा मोठा निर्णय

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून, याचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. कोरोना व्हायरसबाबत ठोस पावले न उचलल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार जागतिक आरोग्य संघटनेवर टीका केली आहे. आता ट्रम्प यांनी अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेपासून वेगळे होत असल्याचे म्हटले आहे. मागील महिन्यात ट्रम्प यांनी मदत निधी थांबवत, संघटनेला चीन धार्जिणी म्हटले होते.

Image Credited – CNBC-TV18

ट्रम्प म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारची ठोस पावले न उचलल्यामुळे अमेरिका संघटनेशी संबंध तोडत आहे. जगाला चीनकडून व्हायरससंबंधी उत्तर हवे असून, सर्वांना याबाबत पारदर्शकता हवी आहे. तसेच, संघटनेला या आधी जारी केलेला निधी इतर जगभरातील आरोग्य संघटनांना दिला जाईल.

Image Credited – The Indian Express

जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून वर्षाला सर्वाधिक 400 मिलियन डॉलर्सचा मदत निधी दिला जात असे. तर दुसरीकडे चीनकडून अमेरिकेचे सर्व आरोप फेटाळले जात आहेत. चीनचे म्हणणे आहे की अमेरिकेने स्वतः संसर्ग रोखण्यासाठी ठोस पावले न उचलल्यामुळे स्वतःची जबाबदारी डब्ल्यूएचओवर ढकलत आहे.

Leave a Comment