चितेंची बाब नाही, आम्ही कोरोनाच्या 4 पावले पुढे – केजरीवाल

देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदविस वाढत चालला आहे. राजधानी दिल्लीत देखील कोरोनाग्रस्त वाढले असून, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दररोज या बाबतची माहिती देत आहेत. केजरीवाल म्हणाले की, कोरोनाग्रस्तांची संख्या वाढणे चिंतेची बाब असले तरी घाबरण्याचे कारण नाही. कारण त्यातील बहुतांश रुग्ण हे घरीच बरे होत आहेत.

Image Credited – GEN

केजरीवाल यांच्यानुसार, मागील 15 दिवसात 8500 कोरोनाचे प्रकरण समोर आले आहेत. मात्र हॉस्पिटलमध्ये केवळ 500 जण भरती झाले आहे. बाकीच्यांवर घरीच उपचार होत आहेत. याशिवाय हॉस्पिटलमध्ये भरती होण्यासाठी फिरावे लागणार नाही. सरकार यासाठी अ‍ॅप आणत आहे.

Image Credited – The Hindu

त्यांनी माहिती दिली की, दिल्ली सरकारने कोरोना रुग्णांच्या दुप्पट बेडची व्यवस्था केली आहे. असे असले तरी लोकांना कोरोना झाल्यावर कोठे जायचे याची माहिती नसते. लवकरच यासाठी एक अ‍ॅप आणले जाईल. ज्यात हॉस्पिटलचा डेटा असेल व कोठे किती बेड रिकामे आहेत. यासाठी एक वेबसाईट देखील तयार केली जात आहे.

Leave a Comment