… अन्यथा तैवानवर हल्ला करणार, चीनने दिली धमकी

तैवान एकीकरण करण्यास तयार न झाल्यास चीनने हल्ल्याची धमकी दिली आहे. चीनच्या सेंट्रल मिलिट्री कमिशनचे सदस्य आणि जाँईंट स्टाफ डिपार्टमेंटचे प्रमुख ली झुओचेंग म्हणाले की, तैवानला स्वतंत्र होण्यापासून रोखण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नसल्यास चीन त्यांच्यावर हल्ला करेल. ली झुओचेंग हे चीनच्या वरिष्ठ जनरल पैकी एक आहेत.

Image Credited – The Trumpet

झुओचेंग म्हणाले की, जर तैवान शांततेने एकीकरणास तयार नसल्यास चीन सर्व नागरिकांना सोबत घेऊन फुटिरतावाद्यांवर कारवाई केली करेल. आम्ही सुरक्षा दलाचा वापर करणार नाही, असे वचन देत नाही. तैवानमध्ये स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आम्ही या पर्यायाला राखीव ठेवले आहे. ते चीनच्या अँटी-ससेन्शन कायद्याला 15 वर्ष झाल्याच्या निमित्ताने बोलत होते. हा कायदा चीनला अधिकार देतो की जर तैवानने वेगळे होण्याचा प्रयत्न केल्यास सैन्य त्यांच्यावर कारवाई करू शकते.

Image Credited – Aajtak

मागील अनेक वर्षांपासून चीन तैवानला स्वतःचा भाग मानत आले आहे. मात्र तैवान स्वतःला लोकतांत्रिक देश मानते. चीनच्या विरोधामुळे तैवानला आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये देखील स्थान मिळालेले नाही.

Leave a Comment