पालयट कोरोना व्हायरसने संक्रमित असल्याची माहिती मिळताच एअर इंडियाच्या दिल्लीवरून मॉस्कोला जाणाऱ्या विमानाला अर्ध्या रस्त्यातून परत बोलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एअर इंडियाच्या ए-320 नियो विमानाने वंदे भारत मिशन अंतर्गत रशियात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी दिल्लीवरून मॉस्कोच्या दिशेने उड्डाण घेतले होते. मात्र पायलट कोरोनाग्रस्त असल्याचे समजताच अर्ध्या रस्त्यातून विमानाला परत बोलवण्यात आले. त्यावेळी विमान उज्बेकिस्तानपर्यंत पोहचले होते. या विमानात एकही प्रवासी नव्हता.
एअर इंडियाचा पायलट निघाला कोरोनाग्रस्त, अर्ध्या रस्त्यातून विमान बोलवले परत
हे विमान शनिवारी दुपारी 12.30 वाजता दिल्लीला पोहचले. विमानातील चालक दलाच्या सदस्याला क्वारंटाईन करण्यात आले आहे. विमानात 4 पायलट इतर क्रू सदस्य देखील होते. रशियात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी आता दुसरे विमान पाठवले जाणार आहे.
विमान उड्डाण घेण्यापुर्वी सर्व क्रू सदस्यांचा रिपोर्ट चेक केला जातो. मात्र एका पायलटचा रिपॉर्ट पॉझिटिव्ह होतो. जो चुकीने नेगेटिव्ह वाचला गेला.