रोशन खानदानातील बेटी पश्मिना बॉलीवूड साठी सज्ज

फोटो साभार जागरण

हिंदी सिनेमा सृष्टीत रोशन खानदानाचे मोठे योगदान आहे. संगीतकार रोशन, त्यांच्या नंतर त्यांची मुले संगीतकार राजेश रोशन आणि अभिनेते, चित्रपट निर्माते राकेश रोशन, त्यांच्या नंतर अभिनेता आणि हँडसम बॉय हृतिक रोशन अशी ही माळ आहे. त्यात आता रोशन घराण्यातील पश्मिना या सुंदर मुलीची भर पडत असून ती बॉलीवूड प्रवेशासाठी सज्ज झाली आहे.

विशेष म्हणजे तिची सोशल मीडियावर ओळख करून देण्याची जबाबदारी हृतिकने घेतली आहे. तिचे अनेक सुरेख फोटो त्याने इन्स्टाग्राम वर शेअर केले आहेत. शिवाय तिच्याबद्दल लिहिताना तो म्हणतो, तुझा मला खूप अभिमान वाटतो. तू आमच्यासाठी खूप खास आहेस कारण तुझी क्षमता असाधारण आहे. तू आमची असल्याने आम्ही स्वतःला नशीबवान समजतो. जगालाही असेच वाटेल याची खात्री आहे.

हृतिक लिहितो पश्मिना वयाच्या मानाने खूप समजूतदार आहे. दिसतेही छान. चित्रपट असो नसो, पश्मिना आमच्यासाठी तारकाच आहे. पश्मिना संगीतकार राजेश रोशन यांची कन्या असून हृतिकची चुलत बहिण आहे. अर्थात बॉलीवूड मध्ये तिचा प्रवेश होम प्रोडक्शन मधून नाही तर अन्य प्रोडक्शन हाउस मधून होणार असल्याचे समजते. ती थियेटर कलाकार असून तिने अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे.

Leave a Comment