मोबाईल नंबर 11 आकडी होणार का ?,अखेर ट्रायचे स्पष्टीकरण

फोटो साभार यु ट्यूब

टेलिकॉम रेग्युलेटरी ऑफ इंडिया म्हणजे ट्रायने एक प्रस्ताव सादर केला असून त्यात मोबाईल नंबर ११ आकडी केले जावेत असा सल्ला दिला असल्याचे सांगितले जात होते. मात्र आता याबाबत ट्रायने स्पष्टीकरण दिले असून, मोबाईल नंबर 10 आकडीच राहणार असल्याचे म्हटले आहे. सध्या 11 आकडी मोबाईल नंबर करण्याचा कोणताच विचार नाही.

काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते की 11 आकडी मोबाईल नंबर केल्याने देशाची मोबाईल नंबर क्षमता १ हजार कोटींनी वाढण्याची शक्यता आहे. मोबाईल नंबर १० आकडी वरून ११ आकडी झाला तर जादा नंबर उपलब्ध होऊ शकणार आहेत. ट्रायने फिक्स लाईनवरून कॉल करताना मोबाईल नंबरच्या अगोदर शून्य लावण्याचा प्रस्तावही दिला आहे. सध्या फिक्स लाईनवरून शून्य न लावताही थेट मोबाईल नंबर लावता येतो. मात्र शून्य लावले गेले तर २,३,४ व ६ मध्ये सर्व फ्री सबलेव्हल्स, मोबाईल नंबर म्हणून वापरता येणार आहेत. नवीन नॅशनल नंबरिंग प्लॅन संदर्भातही ट्रायने प्रस्ताव सादर केला असून असे नंबरिंग लवकरात लवकर उपलब्ध केले जावे असे सुचविले आहे. तसेच, डोंगल साठी वापरले जाणारे मोबाईल नंबर १० आकडी वरून १३ आकडी करण्याचा प्रस्ताव सुद्धा दिला गेल्याचे सांगितले जात होते.

ट्रायने ट्विट करत मोबाईल नंबर 11 आकडी करण्याचा कोणताही विचार नसल्याचे म्हटले आहे व लोकांना पुढेही लोकांना 10 आकडी मोबाईल नंबर मिळत राहतील.

Leave a Comment