व्हिडीओ : कमकुवत ह्रदय असणाऱ्यांसाठी नाही आहे हा रस्ता

सोशल मीडियावर हिमाचल प्रदेशमधील डोंगर, घाटातील अरुंद रस्त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कमकुवत ह्रदयाची व्यक्ती या रस्त्यावरून प्रवासच करू शकत नाही. अरुंद, खडकाळ रस्त्याचा व्हिडीओ आयआरएस अधिकारी अंकुर रपारिया यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

व्हिडीओमध्ये हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यातील सच पास जवळील डोंगराळ रोड दिसत आहे. कारच्या आतून हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला असून, खालील बाजूला बर्फाच्छादित दरी आहे. रपारिया यांनी हा व्हिडीओ मागील वर्षी जुलैमध्ये येथे प्रवास करताना काढला होता.

त्यांनी व्हिडीओ शेअर करत लिहिले की, अतुल्य भारत ! अवघड रस्ते अनेकदा सुंदर ठिकाणी पोहचवतात. हा भाग 8-9 महिने बर्फाने झाकलेला असतो.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून, आतापर्यंत 36 हजारांपेक्षा अधिक जणांना हा व्हिडीओ पाहिला आहे. तर 2 हजारांपेक्षा अधिक जणांनी लाईक केले आहे. अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.

Leave a Comment